किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

357th anniversary of Fort Sindhudurg celebrated with enthusiasm

 

भूषण साटम यांनी छत्रपती शिवरायांवर आधारित काव्याचे केलेले सादरीकरण व कोल्हापूर येथील मर्दानी खेळ ठरले आकर्षण

मालवण | प्रतिनिधी : ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापनदिन गुरुवारी प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग येथे भूषण साटम यांनी कवी भूषण यांचे छत्रपती शिवरायांवर आधारित काव्याचे केलेले सादरीकरण व मर्दानी खेळ सर्वांचेच आकर्षण ठरले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ला परिसर दुमदुमला.

किल्ले सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी मोरयाचा धोंडा याठिकाणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते मोरयाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणोत्सव समिती पदाधिकारी, शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाले. याठिकाणी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यात आले. यानंतर न्यू छत्रपती ब्रिगेडच्या सदस्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर भूषण साटम यांनी शिवरायांवर आधारित कवी भूषण यांच्या काव्याचे सादरीकरण केले.
यावेळी प्रेरणोत्सव समितीचे विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, भाऊ सामंत, गणेश कुशे, रविकिरण तोरसकर, दत्तात्रय नेरकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, मिलिंद झाड, प्रदीप वेंगुर्लेकर, तृप्ती मयेकर, ललित चव्हाण यांच्यासह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.