ठेकेदाराकडून परप्रांतीय कामगाराला जबर मारहाण

Google search engine
Google search engine

गुन्हा दाखल : दोन दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी । वार्ताहर : आपण केलेल्या कामाचे पैसे मागत शिवीगाळ केल्याच्या रागातून परप्रांतीय ठेकेदाराने कामगाराला घरात घुसून मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा परिसरात घडली. या मारहाणीत अखिलेश धरमदेव तिवारी (३८, मूळ रा. बिहार ) याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर संशयीत विजयकुमार संतराम चौधरी (मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. माजगाव नाला), याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तिवारी हा संशयित चौधरी याच्याकडे कामाला होता. दरम्यान आपण केलेल्या कामाचे चौधरी पैसे देत नसल्यामुळे रागातून तिवारी याने त्याला शिवीगाळ केली. हाच राग मनात ठेवून चौधरी याने जखमी तिवारीचे घर गाठत त्याला लाकडी रीपीने मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान तिवारी याने दिलेल्या तक्रारीनुसार चौधरी याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Sindhudurg