मळगाव येथे २७ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीर मळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० व सावंतवाडी तालुका स्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन रुण्यात आले आहे.

ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात होणाऱ्याय वाचक स्पर्धेसाठी मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही एक साहित्यकृती यावर १० मिनिटे परीक्षण सादर करावयाचे आहे. स्पर्धक सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही सार्वजनिक ग्रंथालयाचा वाचक असावा.

तालुकास्तरीय विजेत्या प्रथम (तीन) क्रमांकांना ग्रंथालयातर्फे रु ५००/ रु.३००/ रु. २००/ तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना कुडाळ येथे रविवार दिनांक ४ डिसें २०२२ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेता येणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम ( पाच ) क्रमांकांना रु. १०००/-, रु.७००/-, रु. ५००/-, रु.३००/-, रु. २००/ व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सावंतवाडी तालुका स्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे वाचनालयाच्या माध्यमातून दिनांक २६ नोव्हें २०२२ पर्यंत कार्यवाह श्री गुरुनाथ नार्वेकर (मोबा. ९४२२३७९३४६ ) यांचे कडे नोंदवावी, असे आवाहन ग्रंथालयातर्फे करण्यात येत आहे.

Sindhudurg