पीरलोटे चिरणी मार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

खेड(प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्ग वरील पीरलोटे  चिरणी मार्गावर डंपर ने दुचाकी ला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच करूण अंत झाल्याची घटना २ जून रोजी घडली या प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लक्ष्मण मनोहर येळवी वय ४२ वर्षे सध्या रा. चिरणी रोड प्रमिला अपार्टमेंटच्या पाठीमागे पिर लोटे ता. खेड असे जागीच अंत झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव  आहे
तर या प्रकरणी  -महेश मनोहर वेळवी वय ३८ वर्षे व्यवसाय सिव्हील कॉन्ट्रॅक्टर रा चिरणी यांनी तक्रार दाखल केली असून डंपर चालक चंदू दौडामणी रा वालोपे ता.
चिपळूण जि. रत्नागिरी, मूळ रा. विजापूर राज्य कर्नाटक.याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातीत मयत लक्ष्मण मनोहर येळवी पय ४२ हे त्याच्या ताब्यातील हीरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी क्र. एम. एच. १२ जे. बी. ८९२८ ही चालवित घेऊन पिर लोटे ते लोटे गावठाणवाडी येथे जात असातना चिरणी कडे जाणारे रोडवर निवाचा कडेजवळ सहाचाकी डंपर क्र. एम. एच. ०८ ए. पी. १७०७ वरील चालकाने  लक्ष्मण याचा दुचाकीला पाठीमागून धडक देऊन अपघात केला. सदर अपघातात त्याच्या डोक्यावरुन डंपरचे चाक जावून डोक्यातून व नाकातून रक्त येऊन तो जागीच मयत झालेला आहे.  त्याचे मरणास कारणभूत झालेल्या टाटा कंपनीचा ०६ चाकी डंपर क्र. एम. एच. ०८ ए. पी. १७०७ वरील चालक चंदु दौडामणी सध्या रा. वालोपे ता. चिपळूण यांचे विरुध्द फिर्यादी याने दिले फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आलेला आहे.