Visionary Mumbai Sports Association Bamanoli
सामाजिक बांधिलकी जपण्याचा घेतला वसा
संतोष कुळे | चिपळूण : कुठलेही मंडळ जेव्हा आपण स्थापन करतो किंवा त्याची उभारणी करतो .त्यावेळी त्या मंडळासमोर ध्येय उद्दिष्ट नसतील तर निश्चितच ते मंडळ चिरकाल टिकत नाही. नव्याचे नऊ दिवस …असंच अशा मंडळा बाबत बोलावं लागते. मंडळ नियमाच्या आधारे चालवणे आणि सुस्थितीत वाटचाल ठेवणे यातच निवडलेल्या त्या कार्यकारणीच कौशल्य असते. असंच काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेले “मुंबई क्रीडा मंडळ बामणोली” हे नवनिर्वाचित मंडळ असून अतिशय दूरदृष्टी असलेलं आणि सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ असल्याचं बोललं जात आहे.
तालुक्यातील बामणोली गावांमधील नोकरी निमित्ताने किंवा व्यवसाय निमित्त मुंबईत गेलेले सर्व युवक आणि ज्येष्ठ ग्रामस्थ हे आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायासाठी गेले. आता गावातील लोकांच्या हितासाठी एकत्र येऊन एक संघतेने, एका विचाराने काम करावे आणि ते कायम स्वरुपी एकत्र असावेत, सुख दुःखात सामील व्हावे, यासाठीच नव्याने अस्तित्वात आलेले मुंबई क्रीडा मंडळ बामणोली हे मंडळ कमी कालावधीत नावारूपाला येत आहे.
या मंडळाने संघटन उभारणी नंतर पहिल्यांदाच सर्व युवक एकत्र करत कांदिवली चारकोप येथे बामनोली क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला गावातील प्रत्येक वाडीतील युवकांनी सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी सुद्धा सहकार्य करत त्या स्पर्धेसाठी आपलं सहकार्य आणि मार्गदर्शन केले होते. कोणीतरी मुख्य होऊन हा जो मंडळाचा रथ आहे किंवा त्या मंडळाला योग्य दिशेने चालवण्यासाठी मार्गदर्शक असायला पाहिजे. युवक जे काम करत त्या युवकांना प्रोत्साहित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांना सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर करण्यासाठी कुणीतरी मार्गदर्शनाची भूमिका घ्यावी लागते. यासाठी गावातील मुंबईत असणारे काही उद्योजक व ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत .त्यापैकी अशोक वणगे, सुरेश चांदिवडे, संभाजी वणे, सुधीर तांबे, संतोष गोरीवले, नरेंद्र वणे अशी कीती तरी नावे सांगता येतील जे सहकार्य आणि मार्गदर्शन करीत आहेत. आगामी मे महिन्याच्या 13 तारखेला बामणोली शाळा क्रमांक १ चा अमृत महोत्सव सोहळा होणार आहे . या सोहळ्याच्या निमित्ताने सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून मुंबई क्रीडा मंडळ बामनोली यांच्या वतीने दि. ११ आणि १२ मे रोजी विशेष आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची आखणी सुद्धा केली जात आहे. या क्रीडा मंडळाच्या वतीने गावातील महिलांसाठी एक आदर्श असा एकजुटीचा कार्यक्रम जिथून महिलांच्या ज्ञानाची कस लागते. त्यांच्यातील गुणवत्ता दिसते अशी होम मिनिस्टर ही स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर चाळीस वयोगटातील जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी एक क्रिकेट प्रीमियम लीगचं आयोजन सुद्धा करण्याचा मानस आहे.
महिलांसाठी इतर स्पर्धा मुलांसाठी स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस मंडळाचा आहे. या कार्यक्रमामुळे अमृत महोत्सवाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होणार आहे. दि. ११ , १२ आणि १३ मे हे तीन दिवस बामनोली येथे एकसंघतेचा आणि एकतेचा दर्शन घडवणारा सोहळा होणार आहे. मुंबई क्रीडा मंडळ बामणोलीचे अध्यक्ष संतोष बाबुराव कापले, उपाध्यक्ष अजित किजबिले कार्याध्यक्ष विकास शिगवण सचिव विजय डिंगणकर, खजिनदार राहुल सुवरे व इतर सर्व पदाधिकारी मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून साकारलेले हा कार्यक्रम सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच निश्चितच एक दुरदृष्टी असणारे आणि भविष्यात एक वेगळ्या उंचीचा टप्पा गाठणारे मुंबई क्रीडा मंडळ बामणोली असणार आहे. भविष्याचा वेध घेणारे मंडळ असून कार्यकारिणीच्या खांद्यावरती निश्चित मोठी जबाबदारी असणार आहे.