सेवानिवृत्त शिक्षक केजीटन परेरा यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : म्हापसा गोवा येथील सेवानिवृत्त शिक्षक केजीटन मारियान परेरा (८०, मूळ रा. सावंतवाडी) यांचे अल्पशा आजाराने म्हापसा गोवा येथे राहत्या घरी निधन झाले. मोरजे गोवा येथे पीटर अलवारीस हायस्कुलची त्यांनी स्थापना केली होती. पीटर अलवारीस हे गोवा मुक्ती लढ्याचे स्वांतंत्र सैनिक होते. त्यांची आठवण म्हणून या हायस्कुलची स्थापना करण्यात आली होती. समाजवादी नेता म्हणून सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. मधू दंडवते ,एस एम जोशी, जॉर्जे फेर्नांडिस हे त्यांचे आदर्श होते. त्यांच्यासाठी ते काम करायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी अँजेला, मुलगी ॲड. विजया, मुलगा भारत जावई, नातवंडे, भाऊ पॉली परेरा, जॉन परेरा, बहिणी फातिमा परेरा, हेलन परेरा, पुतणे बेनहर परेरा, जेसन परेरा असा परिवार आहे. सोमवार १० एप्रिल रोजी त्यांची अंत्ययात्रा म्हापसा गोवा येथील घरापासून निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.