डॉ.जी.टी.राणे व डॉ.सई राणे यांचा सत्कार

Dr. GT Rane and Dr. Sai Rane felicitated

वेंगुर्ला | प्रतिनिधी : आरोग्य दिनाच्या निमित्ताने मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळचे संचालक डॉ.जी.टी.राणे व डॉ.सई राणे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल जनसेवा प्रतिष्ठानतर्फे व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे संचालक डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.महेंद्र सावंत, डॉ.संतोष जाधव, डॉ.गोविद जाधव, डॉ.सई लिगवत, डॉ.लेखा रानडे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत तसेच लायनेसचे प्रदिप वेंगुर्लेकर उपस्थित होते. आधुनिकीकरण,

प्रगत तंत्रज्ञान व धावपळीच्या युगात दिवसेंदिवस वैद्यकीय व्यवसाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या विळख्यात सापडल्याने डॉक्टर व रुग्ण यांच्यातील दुजाभाव वाढत असला तरी भविष्यात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना वाढणे काळाची गरज असल्याचे डॉ.संजिव लिगवत यांनी सांगितले.