Kishore Valawalkar first; District Level Essay Competition
मालवण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी आणि फुले शाहू, आंबेडकर, विचार मंच मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 28 स्पर्धकांनी आपले निबंध पाठवले होते. यामधून प्रथम क्रमांक किशोर अरविंद वालावलकर (सावंतवाडी) यांनी प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक श्रद्धा सूर्यकांत कदम (कणकवली), तृतीय क्रमांक नीता नितीन सावंत (सावंतवाडी) साहिल रघुनाथ कासार, उत्तेजनार्थ क्रमांक विजय राघव ठाकूर (कुडाळ), सानिका जगदीश वायंगणकर (मालवण) यांनी प्राप्त केले आहेत.
निबंध स्पर्धेचे परीक्षण संग्राम कासले यांनी केले. निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ 9 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बॅ. नाथ सेवांगण मालवण येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन सेवांगण, समाज कल्याण विभाग, बार्टी, व फुले, शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.