खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील वाडीबीड येथील रहिवाशी व सध्या कळवा ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या सुनिधी मोहन कदमने नीट परीक्षेत ७२० पैकी ६४५ गुण प्राप्त करत यशाला गवसणी घातली आहे.
१२वीनंतर सुनिधीने नीट परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिद्द व चिकाटीच्या बळावर ती नॅशनल एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी प्रविष्ठ झाली होती.
या परीक्षेसाठी
भारतातून २५ लाख विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते
त्यातून सुनिधी हिने अथक प्रयत्नानून ६४५ गुण प्राप्त करत आई-वडिलांनी उपसलेले कष्ट सार्थकी लावण्याची किमया केली आहे. ती आता नामांकित शासकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. प्रवेशासाठी पात्र ठरली आहे.










