जलजीवन मिशन योजनेतील अंदाजपत्रकात गावापेक्षा ठेकेदाराचे हित पाहण्याचा विभागाचा कारभार

Google search engine
Google search engine

माजी उपसरपंच ऍड. राकेश साळुंखे यांचा आरोप

भिंगलोळी गावाचे नळपाणी योजनेचे दोन कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकावर संशय व्यक्त.

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड शहरानजीक असलेले स्मार्ट ग्राम भिंगळोली गावात जलजीवन मिशन या योजनेंतर्गत मंजूर असलेली नळपाणी योजना सद्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या गावाचे माजी उपसरपंच राकेश साळुंखे यांनी या योजनेच्या अंदाजपत्रकावरून विभागाच्या उपअभियंता यांच्यावर ठेकेदारचे हित लक्षात घेवून अंदाजपत्रक तयार केले असल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार श्री. साळुंखे यांनी माध्यमांना प्रसिद्धी पत्रके देत माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.प्रसिद्धीपत्रकाच्या माहितीनुसार, भिंगळोली गावासाठी मंजुरी व निविदा प्रक्रिया पार पडलेल्या जलजीवन योजनेतील नळपाणी योजनेचे दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. इतक्या मोठ्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार केले असले तरी यामध्ये नवीन उद्धभव विहीर व साठवण टाकी निर्मितीचा समावेश नाही. केवळ पाईप लाईन साठी दोन कोटी रुपये निधी खर्च करण्याचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत श्री. साळुंखे यांनी पत्रकार म्हटले आहे की,शहरानजीक असलेल्या भिंगळोली गावाचा भविष्यकालीन वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठ्याचा या अंदाजपत्रकात विचार केलेला नाही. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकात उद्धभव विहीर व साठवण टाकी यांची संख्या वाढवणे आवश्यक होते. मात्र अंदाजपत्रकात उद्धभव विहीर व साठवण टाकी यांचे कामच घेतले नाही, केवळ पाईपलाईन वर अतिरिक्त खर्च टाकण्यात आला आहे. गावाचा भविष्यकालीन लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाची ही भूमिका गावाच्या हिताची नसून भविष्यात गावासाठी अडचणीची ठरणार असल्याने पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराचे हितच या योजनेद्वारे जपत असल्याचा आरोप श्री. साळुंखे यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून उपरोक्त बाबी अंदाजपत्रकात समाविष्ठ कण्याची मागणी त्यांनी केली.

भिंगळोली गावामध्ये केवळ एकच विहीर आहे, त्या विहिरीतील पाणी एप्रिल-मे महिन्यात पुरेसे राहत नाही. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून येथील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. या योजनेचे अंदाजपत्रक तयार करताना गावाचा कोणताही सर्वे न करता व ग्रामस्थांना विश्वासात न घेता अंदाजपत्रक तयार केले असल्याने अंदाजपत्रकात अनेक त्रुटी आहेत. केवळ मेनलाईनची पाईपलाईन याचेच सुमारे 2 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून तसेच गावाची भौगोलिक रचना न पाहता परस्पर केलेले अंदाजपत्राकामध्ये गावात अनेक ठिकाणची वस्ती तसेच वाढीव लोक वस्तीचे क्षेत्र अंतर्भुत केलेले नाही.या सर्व बाबींवर तात्काळ कार्यवाही न केल्यास याचे विरोधात आम्ही कोर्टात जावून दाद मागणार व 1 मे 2023 रोजी जन आंदोलन करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यावेळी सद्याचे भिंगळोलीचे सरपंच यांच्या विरोधात करण्यात आलेल्या चौकशी अहवालाची दखल न घेतल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून त्या चौकशी अहवालाची होळी देखील यावेळी करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात प्म्हतले आहे. .राकेश साळुंखे यांनी केलेल्या अंदाजपत्रकाच्या त्रुटीच्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागच्या मंडणगड उपविभागाच्या उपअभियंता प्रतिभा शेरकर यांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.