खेड : भोस्ते ग्रामस्थांची अन्न पुरवठावर धडक खेड तालुक्यातील निळीक येथे रेशन दुकानातील तांदळामध्ये प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळल्याच्या संशयाने खळबळ उडालेली असतानाच भोस्ते येथील ग्रामस्थांनीदेखील प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळून आल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयातील अन्नधान्य पुरवठा विभागावर धडक देवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.निळीक येथील एका उत्सवासाठी रेशन दुकानातून मोठ्या प्रमाणात तांदूळ घेण्यात आले होते. महिलांकडून या तांदळाची निवड सुरू असताना त्यांना तांदळातील काही दाणे संशयास्पद वाटले. हे दाणे प्लास्टिकसदृश्य असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी आढळून येणारा तांदूळ हा फोर्टीफाईड (तटबंदी) प्रकारचा असून तो शरिरासाठी पौष्टीक असल्याचा निर्वाळा दिला आहे.