अंध बांधवांचे माहेरघर असलेल्या ‘नॅब नेत्र रुग्णालया ‘ची ओळख सर्वदूर व्हावी : भावेश भाटिया

Google search engine
Google search engine

 

सावंतवाडीतील नॅब नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन

नॅब जिल्हाध्यक्ष अनंत उचगांववर यांच्या कार्याचा गौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील “नॅब नेत्र रुग्णालय” हे अंध बांधवांचे माहेरघर आहे. त्यामुळे सांगली हैदराबाद प्रमाणे भविष्यात या रुग्णालयाच्या माध्यमातून अंध बांधवांची सेवा करताना रुग्णालयाची ओळख सर्वदूर व्हावी असे काम करा. त्याचबरोबर रुग्णालय उभारणीत नेबचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनंत उचगावकर यांची मेहनत आपण जवळून पाहीली आहे. त्यामुळे ते अंध बांधवासाठी भारतरत्न आहेत आणि भविष्यातही राहणार, असे गौरवोद्गार उद्योजक भावेश भाटीया यांनी काढले.दरम्यान, मोठमोठे कार्यक्रम, वाढदिवस अशा गोष्टींसाठी नाहक खर्च न करता या रुग्णालयाला मदत करून अंधांना दृष्टी आणि आरोग्य सेवा देण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी दिली.

नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी भटवाडी येथे उभारण्यात आलेल्या नॅब नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन उद्योजक भावेश भाटिया तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते व्यासपीठावरून होते.यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिधुदुर्ग नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.बी एस नागरगोजे, महाराष्ट्र नॅब अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सचिव गोपी मयुर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राघवेंद्र तळेगावकर, सचिव सोमनाथ जिगजिन्नी, अशोक गुप्ता, आबा कशाळीकर, रोटरीच्या विनया बाड, उद्योजक एम बी मिशाळ, अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. संदीप सावंत, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. दिमाख धुरी, ॲड. शामराव सावंत, रमेश भाट, सत्यजित धारणकर, राजू पनवेलकर, श्वेता शिरोडकर, ममता पाटणकर, दर्शन रासम, देवता हावळ, सुजाता परब, प्रसाद माने, वल्लभ नेवगी, संगीता प्रभू, आबा कशाळीकर, प्रसाद महाले, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

प्रत्येकाने जीवनात व्हिजन ठेवून काम केल्यास कोणीही मागे राहत नाही. तो आपल्या यशाचा टप्पा नक्कीच गाठू शकतो. याचप्रमाणे अनंत उचगावकर यांनी सावंतवाडी नेत्र रुग्णालयासाठी व्हिजन ठेवून काम केले. त्यांची मेहनत आपण जवळून पाहिली आहे. हॉस्पिटल साठी दिवस-रात्र काम करताना पाच दहा हजाराच्या मदतीसाठी ही त्यांनी स्वतःला झोकून दिले. काही समाजकंटकांनी याला विरोध केला. मात्र, विरोधाला विरोध न करता ते पुढे चालत राहिले. त्यामुळे राज्यातील दानशूर व्यक्तीनी या रुग्णालयासाठी आर्थिक स्वरूपात पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,एम बी मिशाळ, विनया बाड, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार विद्याधर टायशेट्ये, गोपी मयूर आदींनी शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंध बांधवांसह, सावंतवाडी ती ल नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
नेत्र रुग्णालयासाठी सर्वतोपरी सहकार्य : ना. दीपक केसरकर
अयोध्या दौर्‍यावर असलेले राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याने ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. भविष्यात या नेत्र रुग्णालयासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.