उपळे मोडकवाडी या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

भाजपा तालुकाध्यक्ष महेश खामकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील उपळे मोडकवाडी या रस्त्याचे भूमिपूजन भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर यांच्या हस्ते पार पडले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून २५/१५ या योजनेअंतर्गत उपळे मोडकवाडी या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी पाच लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे हे भूमिपूजन पार पडले. यावेळी तालुका अध्यक्ष महेश खामकर यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, उपळे सरपंच वैदेही वीर, भाजपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोहर भिडे, तालुका प्रभारी वसंत घडशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काही महिन्यापूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा पराभव करून उपळे ग्रामपंचायतीने यश मिळवले होते. तेव्हापासूनच या गावांमध्ये विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर हे काम मंजूर करण्यात आले असून त्याचा हा भूमिपूजन समारंभ पार पडला आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे यांनी सांगितले की, पक्षाच्या माध्यमातून विकास कामांना भरघोस निधी मिळत आहे. त्यामुळे पक्षासाठी देखील सर्वांनी यापुढे योगदान दिले पाहिजे तरच अधिक चांगल्या प्रकारे गावचा विकास होईल असे मनोगत व्यक्त केले

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता उपसरपंच आत्माराम धुमक, अनंत चौगुले, अनिकेत वीर ,ग्रामपंचायत सदस्य मैथिली धुमक, शांताराम पडत, राजाराम गुरव ,राजेंद्र धुमक, गणपत पेजे ,केशव फणसे, दत्ताराम धुमक, लक्ष्मण घवाळी, रंजना धुमक, सुप्रिया धुमक, स्वप्नाली गुरव, राजेंद्र मोडक आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. आभार बुथ अध्यक्ष राजेंद्र मोडक यांनी मानले.