खेडमध्ये आणखी ४ गावे तहानलेली

Google search engine
Google search engine

खेड | प्रतिनिधी : तालुक्यात उन्हाची काहिली वाढल्याने नैसर्गिक जल स्रोत आटत चालले आहेत. सद्यस्थितीत ४ गावातील गावातील ६ वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर धावत आहेत कुळवंडी- धनगरवाडी खवटी खालची धनगरवाडी, खोपी-रामजीवाडी, धनगरवाडी येथेही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली.आहे गाव-वाड्यांच्या सर्वेक्षणानंतर दाखला प्राप्त होताच टँकरने पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले.

पोसरे बुद्रुक सडेवाडी येथे पाण्याचा पहिला टँकर धावल्यानंतर गाव-वाड्यांची संख्या वाढली. केळणे-भोसलेवाडी, चिरणी-धनगरवाडी, खवटी-वरची
मांगलेवाडी, धनगरवाडी याठिकाणी पाण्याचा
टँकर धावू लागला. जलस्रोतांमध्ये घट होवू लागल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क आहे.

तालुक्यातील खवटी-खालची धनगरवाडी, खोपी-रामजीवाडी, कुळवंडी धनगरवाडी,सवणस-मूळगाव
येथील ग्रामस्थांनाही.पाणीटंचाईचे चटके बसत आहेत.
टैंकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकड़े अर्ज दाखल केले आहेत, मात्र अद्याप टैंकरने पाणीपुरवण सुरू
झाला नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोड़त आहेत. याठ्किाणी तातडीने टैंकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.