मालवण | प्रतिनिधी : मालवण खरेदी विक्री संघांचे संस्थापक अध्यक्ष स्व. नानासाहेब ढोलम यांनी त्यावेळी दुरदृष्टी ठेवून संस्थेसाठी घेतलेल्या जागेत आज संस्थेची नवीन इमारत उभी राहणार आहे. मालवण खरेदी- विक्री संघ ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या प्रत्येक संचालक, सदस्याने संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवतानाच आपली जबाबदारी पार पाडावी. नव्या इमारतीत आणखी चांगला कारभार हाकताना मालवण खरेदी विक्री संघाला यशोशिखरावर न्यावे, असे प्रतिपादन खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जयवंत ढोलम यांनी केले.
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तुच्या कामाचे भूमिपूजन माजी चेअरमन जयवंत ढोलम यांच्या हस्ते आज करण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, व्हा.चेअरमन कृष्णा ढोलम, भाजप सहकार आघाडीचे बबलू राऊत, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, शिवसेना जिल्हा सचिव किसन मांजरेकर, दीपक पाटकर, खरेदी विक्री संघांचे संचालक महेश मांजरेकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, आबा हडकर, अशोक तोडणकर, महेश गावकर, अमित गावडे, सुरेश चौकेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, अभय प्रभुदेसाई, कृष्णा चव्हाण, अमृता सावंत, पूजा करलकर, पूजा वेरलकर, गणेश कुशे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, रवी टेंबुलकर, नारायण लुडबे, हरीश गावकर, परशुराज पाटकर, राजा देसाई, गौरव पाटकर, महेश सारंग, सुभाष तळवडेकर, अरुण तळगावकर, सुहास हडकर, दिनेश ढोलम, बबन चव्हाण, यासह शेतकरी, ग्राहक, विकास सोसायटी चेअरमन, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे खरेदी विक्री संघाकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना चेअरमन राजन गावकर यांनी खरेदी विक्री संघाच्या नव्या इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास नेऊ, उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी अशोक सावंत यांनी खरेदी विक्री संघाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे ग्राहक नेहमीच समाधानी असतात, नव्या इमारतीद्वारे खरेदी विक्री संघाचा कारभार आणखी वेगवान होऊन नावलौकिक आणखी वाढावा असे सांगितले. यावेळी धोंडी चिंदरकर यांनीही खरेदी विक्री संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले.