भाजपा आरोंदा जि. प. मतदार संघ आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांचा रक्तदान

केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

सातार्डा । प्रतिनिधी : केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा आरोंदा जि. प. मतदार संघ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर रविवार ९ एप्रिल रोजी सातार्डा येथील “माई सभागृह” येथे झाले. या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी सहभागी होऊन शिबीर यशस्वी केले.

शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी सभापती सौ शर्वाणी शेखर गांवकर,शेखर गांवकर,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी – दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष झिलू राऊळ,शक्तीकेंद्रप्रमुख रवींद्र धुपकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, किनळे सरपंच दीपक नाईक,तळवणे सरपंच समीर केरकर,कास सरपंच प्रवीण पंडित,आपा पारिपत्ये,मडूरा उपसरपंच बाळू गावडे,आबा सातोसकर,ज्ञानेश्वर मांजरेकर,शेखर प्रभू,उदय सातार्डेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले तर संदीप नेमळेकर,भाजपचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदान केले .

रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफलाईन हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालय ओरोस रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले.

Sindhudurg