आरोंदा येथील मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Google search engine
Google search engine

सातार्डा I प्रतिनिधी : आरोंदा गावचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व उद्योजक डॉ. प्रभाकर यशवंत नाईक यांनी त्यांच्या स्वर्गीय पत्नी सौ. पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आरोंदा गावी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. आरोंदा ग्रामोन्नती मंडळ,मोहन भोगले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला सावंतवाडीहून प्रसिद्ध डॉक्टर राजेश गुप्ता. नेत्रतज्ञ डॉक्टर धुरी डॉक्टर लेले ,डॉक्टर नार्वेकर, डॉक्टर चोडणकर डॉक्टर दळवी डॉक्टर दीप्ती कळंगुटकर आदी तज्ञ डॉक्टर सहभागी झाले असल्याने ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

आरोंदा येथे संपन्न झालेल्या या शिबिरात सुमारे ३२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील सुमारे १०० नेत्र रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोहर रामचंद्र आरोंदेकर यांनी केले .या शिबिरास मोहन भोगले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री . संदेश परब यांचे विशेष सहकार्य लाभले.

सावंतवाडी आयुर्वेद कॉलेजचे स्टाफ ,डॉक्टर विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी सावंतवाडी लायन्स क्लब आणि आयुर्वेद कॉलेज तर्फे मोफत औषध वाटप करण्यात आले .या शिबिरास ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष विद्याधर नाईक, सचिव चेतन आरोसकर, मोहन भोगले प्रतिष्ठानचे सचिव रामदास पेडणेकर , खजिनदार आगुस्तिन फर्नांडिस, विश्वस्त केदार शिरोडकर ग्रामोन्नती मंडळाचे नारायण राणे ,लायन्स क्लबचे अध्यक्ष विद्याधर तावडे, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, लायन्स क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते. आरोंदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नेत्र तांत्रिक सहाय्यक तुषार पवार आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Sindhudurg