वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : बाजारपेठ सावंतवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात १३ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार १३ एप्रिल रोजी श्री साईभक्त मंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त सकाळी ७ वा. साईंची पूजा अभिषेक व आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद तर रात्री ८ वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘कृष्णपूजन’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. श्री साई वात्सल्य, मेनरोड बाजारपेठ सावंतवाडी येथे हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईभक्त मंडळ भवानी चौक तर्फे करण्यात आले आहे.
Sindhudurg