श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

  • भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी राजवाडा येथील पाटेकर देवस्थानसमोर नारळ ठेवून करण्यात आला. यावेळी आ. नितेश राणे यांनी १२ नोव्हेबर रोजी होत असलेल्या या निवडणूकीत या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भाजपा नेते युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक व पॅनल प्रमुख महेश सारंग, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, माजी जि.प .उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, पॅनलचे उमेदवार दत्ताराम कोळंबेकर, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, सोनू गावडे, ज्ञानेश परब, राघोबा राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, सोनू जाधव, नारायण हिराप यांसह

भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sindhudurg