गुहागर l प्रतिनिधी :जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला .त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री अशोक गावणकर साहेब, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर जी कोळथरंकर ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पालशेतकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संध्या पालशेतकर ,सुधीर रोहीलकर ,तुषार पालशेतकर प्रेरणा रोहीलकर ,अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले .त्यावेळी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शंकरजी कोळथरकर हे होते .त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गावणकर साहेब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले .ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी गावणकर साहेब यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कोळथरकर साहेब म्हणाले की शाळेने राज्यस्तरापर्यंत विविध उपक्रमांचे सादरीकरण शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून केले आहे. शाळेने गुणवत्तेच्या बाबतीत अनेक उपक्रम राबवले आहेत. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून व सूत्रसंचालन अंजली मुद्द्यांवर यांनी केले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.











