Vanchit Bahujan Aghadi protest today
खेड : खेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १० एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात महागाईविरोधात एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महागाईचा आगडोंब उसळत असून स्वयंपाकाच्या गॅसपासून जीवनावश्यक वस्तूपर्यंत महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. शेतकरी देखील मेटाकुटीस आला आहे. केंद्र व राज्य सरकार महागाईवर नियंत्रण मिळवत नसल्याने सरकारविरोधात हे आंदोलन होणार आहे.