सोनवी पुलाच्या कामाला मिळणार गती

Google search engine
Google search engine

The work of Sonvi bridge will get speed

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्‍वर येथील सोनवी नदीच्या पुलाच्या बांधकामाची तयारी आता संबंधित ठेकेदाराकडून करण्यास सुरूवात झाली आहे. महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी आता सर्वच ठेकेदार कंपन्यांनी कंबर कसली आहे. सोनवी नदीवरील रखडलेला पूल आराखडा अखेर मार्गी लागल्याने महामार्गाच्या कामास आता गती मिळाली आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील नद्यांवरील पुलाचे बांधकाम हा महामार्ग पूर्ण होण्याच्या कामातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. यापैकी काही नद्यांवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र या पुलासाठीचे जोडरस्ते मात्र अपूर्ण आहेत.