Record registration for CET… See how many students will take the exam
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीला यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 19 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी 2 लाख 95 हजार 844 आणि पीसीएम ग्रुपसाठी 3 लाख 23 हजार 189 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीईटी 9 मेपासून सुरू होणार आहे.