Vaibhavwadi BJP distributes fruits to patients on the occasion of Union Industries Minister Narayan Rane’s birthday
वैभववाडी | प्रतिनिधी : राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय वैभववाडी या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा सदस्य राजेंद्र राणे, नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, महीला अध्यक्ष प्राची तावडे, न.पं. बांधकाम सभापती विवेक रावराणे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, न.पं. सभापती यामिनी वळवी, माजी तालुका अध्यक्ष उत्तम सुतार, नगरसेवक राजन तांबे, उंबर्डे सरपंच वैभवी दळवी, माजी सरपंच एस. एम. बोबडे, पुंडलिक साळुंखे, प्रदीप नारकर, डॉ. सयाजी धर्मे, डॉ. किरण पाटील, कर्मचारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.