देवगड मेडिकल फाउंडेशन येथे अत्याधुनिक एक्स रे सुविधा

State-of-the-art X-ray facility at Devgad Medical Foundation

देवगड मेडिकल फाउंडेशन येथे गेली कित्येक वर्ष रुग्णांना आधुनिक उपचार पद्धती व निदान पद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी आतापर्यंत सी आर ही आधुनिक डिजिटल एक्स रे सुविधा उपलब्ध होती. या सुविधॆचे आधुनिकीकरण करण्यात आलं आहे.नवीन डायनामिक डिजिटल रेडिओ ग्राफी हे फिफ्थ जनरेशन टेक्नॉलॉजीचे भारतातले पाचवे आणि महाराष्ट्रातील तिसरे अत्याधुनिक एक्स रे सुविधा देवगड मेडिकल फाउंडेशन येथे उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अधिकाधिक सुस्पष्ट एक्स-रे घेणे शक्य होणार आहे. तसेच भविष्यात रियल टाईम एक्स-रे सुविधा देता येईल. या सुविधेचे उद्घाटन डॉ भगत डॉ विटेकर व डॉ केसरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्याचबरोबर खेडोपाडी राहणाऱ्या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांचा विचार करून पोर्टेबल एक्स-रे ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी जवळपास एक्स रे सुविधा नाही अशा ठिकाणी रुग्णांना देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे त्यांच्या घरीच एक्स-रे उपलब्ध करून देता येईल .सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची होम एक्स रे सुविधा प्रथमच उपलब्ध झाली आहे. या सुविधा सोबतच इलेक्ट्रॉनिक सर्वाइकल ट्रॅक्शन व इलेक्ट्रॉनिक लंबर ट्रॅक्शन ही सुविधा पाठ दुखी कंबर दुखी मान दुखी इत्यादी आजाराच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिकाधिक रुग्णांनी या सुविधांचा फायदा घ्यावा असे आव्हान अस्थिरोग तज्ञ डॉ तन्मय आठवले यांनी केले आहे.