Get ready for national service in ISTRO by becoming scientists, astronauts: Governor Ramesh Bais
दापोली | प्रतिनिधी : काल झालेल्या मा. राजभवन, मुंबई येथे जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उप मुख्यकार्यकारी अधिकारी, राहुल देसाई, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव ,वैद्यकिय अधिकारी शिर्के आणि नासासाठी निवड झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे तसेच नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले; आणि नियोजित २५ मे ते ५ जून च्या (नासा) अमेरिका दोर्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बैस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जिल्हा परिषद रत्नागिरीने दिलेल्या इस्त्रो-नासा भेटीच्या संधीचे सोने करत,या संधीचे फलीत म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात शास्त्रज्ञ,अंतराळवीर होऊन आपल्या इस्रोमध्ये देशसेवा करावी अशा शुभेच्छा देत, सर्वांना ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तक भेट दिले.