केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मठ येथे नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन..

Google search engine
Google search engine

१०० ग्रामस्थांनी घेतला लाभ : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले उद्घाटन..

वेंगुर्ले | दाजी नाईक : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मठ येथील स्वयंभु मंगल कार्यालय येथे मोफत नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , मठ सरपंच सौ.रुपाली नाईक , महीला मोर्चाच्या सौ.स्मिता दामले, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, उपसरपंच महादेव गावडे , युवा नेते अजित नाईक , नेत्रचिकीस्ता अधिकारी आर.बी.तेली , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व दशरथ ( भाऊ ) गडेकर , शक्तीकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर , ग्राम.पं.सदस्य संतोष वायंगणकर व शमिका धुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटन पर मार्गदर्शन करताना मनिष दळवी म्हणाले की वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम केले जातात, परंतु नेत्रचिकीस्ता शिबीर आयोजित करून नविन दृष्टी देण्याचे पुण्ण्याचे काम या शिबीराच्या माध्यमातून केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले . तसेच भाजपा च्या माध्यमातून भविष्यातही असेच लोकपयोगी उपक्रम आयोजित करावे असे आवाहन केले.शिबीराच्या उद्घाटनानंतर मठ सरपंच रुपाली नाईक व महीला अध्यक्षा स्मिता दामले व उपस्थित महीलांच्या हस्ते केक कापून नाम.नारायणराव राणे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .
यावेळी मठ बुथ प्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी , महेश धुरी , प्रशांत बोवलेकर , नितिश कांबळी , सुरेश धुरी , स्वप्नील धुरी , लक्ष्मी परब , प्रकाश मोबारकर , कविता घोलेकर , नारायण सावंत , समीर नाईक , प्रसाद मठकर , पपु मठकर , कानु गावडे , सुकन्या तेंडोलकर , सुनील गावडे, जगन्नाथ धुरी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र खानोलकर यांनी केले