खेडमधील लोटे, भरणे येथे गावठी हातभट्टी दारू धंद्यावर धाडी तिघावर गुन्हा

खेड(प्रतिनिधी) येथील पोलिसानी लोटे ,भरणे आदी परिसरात अवैध रित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर धाडी टाकून हजारो रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई १८ जून रोजी करण्यात आली.
लोटे माळवाडी येथे टाकण्यात आलेल्या धाडीत १ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात येऊन  दिलीप गंगाराम मोरे, वय ५० वर्षे, रा. आवाशी, मधलीवाडी, ता. खेड,याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 भरणे नाका एस.टी. स्टॉपच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर टाकलेल्या धाडीत   ३,१२० रु किमतीची ३५ लिटर दारू जप्त करून रविंद्र राजाराम पाष्टे, वय ३८ वर्षे रा. मोरखंडे पडमवाडी ता. खेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे
दरम्यान याच परिसरात भरणे सन्मान हॉटेलच्या पाठीमागे जंगलमय भागात एका जंगली झाडाखाली सुरु असलेल्या दारू धंद्यावर धाड टाकून ३,३००/-रु. किंमतीचे ३५ लिटर दारू जप्त करण्यात आली या प्रकरणी  – विलास तुकाराम पवार, वय ५३ वर्षे रा. भरणे शिक्षक कॉलनी ता. खेड याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे