केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा बँकेच्या पाठिंब्यामूळे आमचा विजय निश्चित

Google search engine
Google search engine

आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास

पहिली युती कोकणातून त्यामुळे विजयाचा गुलालही कोकणातून उधळणार

खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय

सावंतवाडी । प्रतिनिधी :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वातील केंद्र सरकारने व राज्यातील भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारनेही शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असंख्य महत्वाच्या योजना राबविल्या आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांच्या माध्यमातूनही अनेक रोजगार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार व सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही आपल्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या पाठीशी असल्याने शेतकऱ्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आपले पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार निश्चितच निवडून येतील. भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची पहिली युती ही कोकणात झाली असून ‘गुलाल’ देखील कोकणातून उधळणार, असा विश्वास भाजपचे नेते आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळीभाजपा नेते युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक व पॅनल प्रमुख महेश सारंग, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, माजी जि.प .उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, पॅनलचे उमेदवार दत्ताराम कोळंबेकर, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, सोनू गावडे, ज्ञानेश परब, राघोबा राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, सोनू जाधव, नारायण हिराप आदी उपस्थित होते.

Sindhudurg

केंद्रातील सरकारने मागील आठ वर्षात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना जाहीर करून अनेक हिताचे निर्णय वेळोवेळी घेतले आहेत. अगदी कोरोना काळात देश आर्थिक संकटात असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले होते. राज्यातील भाजपा युती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता आल्यानंतर अल्पावधीतच कोकणातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये प्राप्त करून दिले. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघातर्फ केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा बँक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांचे हित साधण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या निवडणुकीतील आमचे पॅनल हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी या पॅनलचे प्रमुख तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग व त्यांचे सर्व सहकारी तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते एक दिलाने व प्रामाणिकपणे या निवडणुकीत प्रचार करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आमचा विजय निश्चित असून यापुढे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  1.       मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या सरकारमुळे राज्यात रखडलेला विकास पुन्हा मार्गी लावण्यासाठी राज्यात भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युतीचे सरकार निर्माण झाले. त्यामुळे स्थानिक पातळीवरही शेतकरी व जनतेच्या हितासाठी जिल्ह्यात होणाऱ्या खरेदी विक्री संघाच्या या निवडणुकीत एकत्र येण्याचे आमच्या नेत्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांचे आदेश मानून ही निवडणूक युतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. यापुढील निवडणुकांमध्ये त्या त्यावेळी वरिष्ठ जो निर्णय घेतील व जसे आदेश येतील त्याप्रमाणे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याचे पालन करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.