भिंगळोली ग्रामपंचायतीचा पत्रकार परिषदेत खुलासा
मंडणगड | प्रतिनिधी : प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या चुकांचे खापर ग्रामपंचायतींवर फोडून गावाच्या बदनामीचे प्रकार विरोधकांनी थांबवावेत गावाच्या विकासाकरिता खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सगळ्यांचे स्वागत असल्याचे प्रतिक्रीया भिंगळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती विजया दरवडा, यांनी 10 एप्रिल 2023 रोजी भिंगळोली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, उपसरपंच संदीप कदम, ग्रामपंचायत सदस्य राजू दिवेकर, कावेरी इंगवले, नम्रता पवार, चेतन सातोपे, आदी मान्यवर उपस्थित होते. जल जीवन मिशनचे आंर्तगत गावात राबवण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेते ठेकेदाराचे हित जपत दोन कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होत या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीकडून आज खुलासा करण्यात आला. यात निवदा प्रक्रीया व वर्क ऑर्डर झाली असली तरी योजनेचे काम अद्याप सुरु झालेले नसल्याने भ्रष्टाचाराचा कोणताही संबध येत नाही. आरोप करणाऱ्यांनी भ्रष्टाचार कसा झाला आहे याचा खुलासा करावा अशी प्रतिक्रीया देण्यात आली. योजनेचे नियोजन पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाने केलले आहे. या नियोजनात नवीन नळपाणी योजना असतानाही योजनेसाठी उद्भव विहीरींचा समावेश करण्यात न आल्याने ग्रामपंचायतीने यास विरोध केला आहे.
ग्रामसभेच्या विरोधाच्या ठरावासह सर्व संबंधीत अधिकाऱ्यांकडे योजनेची कार्यवाही तत्काळ थांबवावी असे पत्र ग्रामपंचायतीने दिले आहे. ग्रामपंचायतीचा सध्याचा पाण्याचा वापर याचबरोबर भविष्यकालीन पाण्याची गरज लक्षात घेऊन या योजनेचे रिव्हाईज इंस्टीमेंट तयार करण्यात यावे यात गावाची गरज लक्षात घेऊन योजनेची आखणी करावी अशी मागणीही विद्यमान बॉडीने जिल्हा परिषदेकडे केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. या संदर्भात मंडणगड पंचायत समितीच्या आमसभेतही प्रश्न उपस्थित करणार असल्याचे व यात संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे माजी सभापती आदेश केणे यांनी यावेळी सांगीतले. योजनेचे प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नसल्याने भ्रष्टाचार कसा झाला आहे असा बिनबुडाचा आरोप करण्यापेक्षा गावाच्या बुहआयामी विकासाकरिता सर्वांनीच एकत्रीपणे काम करण्याची आवश्यकता ही यावेळी व्यक्त करण्यात आली.