आय. बी. पी.एस. परीक्षेत लक्ष्मी करंगळेचे सुयश

Google search engine
Google search engine

Success of Lakshmi Karangale in the I.B.P.S exam

वेंगुर्ला : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या आयबीपीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील लक्ष्मी करंगळे यांनी नेत्रदीपक यश मिळवत agriculture field officer हा क्लास वन ऑफिसर बनण्याचा मान मिळवला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म घेऊन अशक्य वाटणारी एखादी गोष्ट अपार कष्टातून साध्य करता येते हे तिने दाखवून दिले आहे. कु. लक्ष्मी महादेव करंगळे जन्मभूमी कर्नाटक आणि कर्मभूमी सिंधुदुर्ग .तिने ही असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवलेली आहे.बारावीपर्यंतचे शिक्षण बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले येथे पूर्ण केले .तर त्यानंतर बीएससी ऍग्रीकल्चर हा पदविका अभ्यासक्रम दापोली विद्यापीठातून चांगल्या गुणांनी पूर्ण केला .
एग्रीकल्चर या विषयाकडे तिने फक्त नोकरीच्या माध्यमातून पाहिले नाही तर तिने तिचे एक स्वप्न म्हणून पाहिले आणि त्याच दिशेने तिने पुढील वाटचाल चालू ठेवली.

वेंगुल्यासारख्या छोट्या गावात राहत असताना शिक्षणाच्या बाबतीत अनेक समस्यांना तिला सामोरे जावे लागले .तंत्रज्ञानाचा अभाव या विषयासंदर्भात हवे असणाऱ्या पुस्तकांचा तुटवडा ….या क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींची कमतरता आणि भौगोलिक परिस्थिती हे सर्व पाहता तीन ते चार वर्षाच्या अथक प्रयत्नातून प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून निवड होणे हे तिच्यासाठी दिवसा पडलेले एक स्वप्नच होते; पण तिने ते पूर्ण करून फक्त आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर आम्हा सर्व सिंधुदुर्गवासीयांची मान ऊंचावली आहे .आई वडील भाऊ आणि बहीण असं छोटसं कुटुंब परंतु घरामध्ये वडील फक्त कमावते आणि तीन भावंडे शिक्षण घेणारी …अशी जेमतेम आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मार्गदर्शन वर्ग नाही किंवा तशी संधी तिला मिळाली नाही. त्यामुळे फक्त सातत्यपूर्ण वाचन चालू घडामोडींवर लक्ष आणि आत्मविश्वास या जोरावरच तिने हे स्वप्न पूर्ण केले .त्यासाठी तिला सातत्याने दोन ते तीन वर्षात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन अभ्यास करत स्वतःचा मार्ग निवडावा लागला आणि जिद्दीने तिने हे सगळं पूर्ण केलं.
आज केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आणि यावर्षी घेण्यात आलेल्या आयबीपीएस या परीक्षेमध्ये तीनही टप्पे पूर्ण करून जवळजवळ संपूर्ण देशभरातून साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून 960 विद्यार्थी निवडले गेले आणि त्यातील आपली ही सिंधू कन्या युनियन बँकेत एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर या प्रथम श्रेणी पदासाठी निवडली गेली आहे. तिच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.तसेच पुढील वाटचालीस सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.