आचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश वराडकर यांचे निधन

Google search engine
Google search engine

Achra Gram Panchayat employee Nilesh Varadkar passed away

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश सीताराम वराडकर वय 57 यांचे सोमवारी मालवण येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी सकाळी आचरा हिर्लेवाडी येथील  स्मशानभूमीत  शोकाकुल वातावरणात त्यांचे अत्यसंस्कार करण्यात आले.
शांत, सुस्वभावी, प्रामाणिक, विश्वासू या गुणांसाठी ते सुपरिचित होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी चुलत नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.