राज्यात हिंदुत्ववादी सरकार : हिंदूंना टार्गेट केलात तर सोडणार नाही
सावंतवाडी । प्रतिनिधी :
पोलीस खात्यात आजही काही अधिकारी असे आहेत की त्यांना आपण ठाकरे सरकारमध्ये असून ते आम्हाला वाचवतील असा गैरसमज करुन आहेत. मात्र, आता राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले असून गृहखाते भाजपकडे आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस खात्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवतील. त्याचप्रमाणे आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा अभ्यास सुरू असून हा कायदा येईल तेव्हा जिल्हा जिल्ह्यामध्ये व गावागावांमध्ये सुरू असलेले धर्मांतराचे प्रश्न निश्चितपणे थांबतील, असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथे हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र येत जन आंदोलन उभारल्यानंतर तब्बल १८ दिवस दूर ठेवण्यात आलेल्या आमच्या एका लहान भगिनीला एका रात्रीत कर्नाटक मधून त्या संबंधित मुलासह परत आणण्यात पोलिसांना यश मिळालं. तीचं मेडिकल करण्याच काम सुरू आहे. जेव्हा जेव्हा हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येऊ तेव्हा अशे प्रकार थांबू शकतात, त्याला आपण आळा घालू शकतो. हाच एक संदेश कालच्या जन आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही दिलेला आहे. पोलिस खात्यात काही विशिष्ट अधिकारी आहेत जे अशा प्रकरणात संबंधितांना मदत करतात, १८ दिवसांपासून ती तरूणी घरी भेटली नाही. पण, कालच आंदोलन होताच काही तासांत ती मुलगी घरी कशी येते म्हणजे तीला संपर्क कसा करायचा हे काहींना ठाऊक होत. हे सगळे विषय आता थांबले पाहिजेत. राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांच सरकार आलं आहे. कुठल्याही हिंदू बांधवांला टार्गेट केल तर त्याला सोडणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूर येथील घटनेबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक महेश सारंग माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर माजी सभापती तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी बबन राणे यांचा पदाधिकारी उपस्थित होते.
Sindhudurg