शोकसभेत संदेश सप्रे यांच्या आठवणी जागवत मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

Google search engine
Google search engine

In the mourning meeting, dignitaries paid emotional tributes to Sandesh Sapre

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी पत्रकार कै. संदेश सप्रे यांचे काही दिवसांपुर्वी अकाली दुःखद निधन झाले. कै. संदेश सप्रे यांची शोकसभा सोमवारी सायंकाळी देवरूखात आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांकडून संदेश सप्रे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शोकसभेत संदेश सप्रे यांच्या आठवणी जागवत मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार व संगमेश्वर तालुकावासियांतर्फे कै. संदेश सप्रे यांची शोकसभा आज देवरूख नगरपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत जेष्ठ प्रतिष्ठीत नागरिक मुकुंद जोशी, बबन बांडागळे गुरूजी, श्रीकृष्ण जागुष्टे गुरूजी, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, गणेश चाचे, जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे, जे. डी. पराडकर, दिपक भोसले, राजू काकडे हेल्प अँकँडमीचे अध्यक्ष गणेश जंगम, फोटोग्राफर असोसिएशनचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष सुरेंद्र गीते आदिंनी आपल्या मनोगतातून कै. संदेश सप्रे यांचे पत्रकारितेतील विविध पैलू उलगडले.

तसेच संदेश सप्रे हे पत्रकारिता करताना त्यांची असलेली लिखाणाची हातोटी वाखणण्याजोगी होती. बातमीपर्यंत पोहचणारा पत्रकार अशी त्यांनी आपली ओळख पत्रकारितेच्या माध्यमातून निर्माण केली होती. त्यांच्या लेखनीत फार मोठी ताकद होती. त्यांनी एखादा विषय हाती घेतला तर तो धसास लागेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करत होते, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढत संदेश सप्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेवटी संदेश सप्रे यांचे मोठे बंधू समीर सप्रे यांनी आपण अल्पावधीत आपला भाऊ गमावल्याची भावना व्यक्त करत संदेश सप्रे यांच्या जाण्याने आम्हा सप्रे कुटुंबाची फार मोठी हानी झाली असून ही हानी कधीही भरून न येण्यासारखी आहे. अशी भावना व्यक्त केली. शोकसभेला सप्रेप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. शोकसभेचे सूत्रसंचालन पत्रकार सागर मुळ्ये यांनी केले.