Great success of ‘Podar Kankavali’ students in various fields.
कणकवली- सतत यशाची उत्तुंग भरारी घेत असणाऱ्या व ज्ञानाच्या क्षेत्रात आपले अनोखी ओळख निर्माण केलेल्या कणकवलीतील ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’ येथील विविध विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत यशाचे शिखरे गाठली आहेत.यातील सर्वात अभिमानास्पद यश संपादन म्हणजे इयत्ता सहावीत शिकणारा शौनक राजेंद्र जातेकर या विद्यार्थ्याने सायन्स ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या व 70 देशातून जवळपास 70 हजार शाळांनी सहभाग घेतलेल्या व त्यातून ओलंपियाडच्या चार विषयातून सर्वोत्तम गुण मिळवणारे 260 विद्यार्थी निवडले गेले. त्यापैकीच शौनक ने देखील उत्तम गुण प्राप्त करत अकॅडमिक एक्ससेलन्स स्कॉलरशिप तसेच चषक, प्रशस्तीपत्र व रुपये ५००० चे कॅश बक्षीस मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर टाकली.
तसेच ब्री बुक्स यांच्यातर्फे आयोजित यंग ऑथर्स फेअर्स यामध्ये लहान मुलांना लेखन करण्याची संधी दिली होती. त्यामध्ये इयत्ता तिसरीत शिकत असणारा अर्णव अभिजीत आपटे याने अगदी लहान वयातच ‘द स्टोन एज मिस्टरी’ या पुस्तकाचे लेखन करीत राष्ट्रीय स्तरावर 175 वा क्रमांक मिळवत बाल लेखक म्हणून लेखन क्षेत्रात अगदी लहान वयातच आपल्या लेखन कार्याचा ठसा उमटवला.त्याचबरोबर इयत्ता तिसरीतील इरा मयूर नागवेकर या विद्यार्थिनीने नॅशनल लेव्हल सायन्स टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेत शंभर विद्यार्थ्यांमधून 14 वा क्रमांक मिळवला. यासाठी तिला सुवर्णपदक,प्रशस्तीपत्र व एक हजार रुपयांचे कॅश प्राईज मिळाले असून या तिन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.यावेळी मार्गदर्शन करताना शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांनी प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही गुण लपलेले असतात ज्यांचा आपल्याला शोध घेऊन त्यांचा विकास करायचा असतो आणि हाच सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो असे सांगत या तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.