S. P. Best Worker Award to Parab
वैभववाडी | प्रतिनिधी : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्मृतिपित्यर्थ कै.अरुण भार्गवे पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार 2022 एस.पी. परब यांना प्राप्त झाला आहे. वैभववाडी येथे आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आल यावेळी वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रसन्नजीत चव्हाण, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, सचिव श्री.संदेश तुळसणकर, तालुकाध्यक्ष श्री. कुमार स्वामी, वैभववाडी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, नगरसेवक मनोज सावंत उपस्थित होते. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी स्मृतिपित्यर्थ ग्राहक चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते कै. अरुण भार्गवे पुरस्कृत कोकण विभागाचा पहिला उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार 2022 साठी संस्थेकडून विभागनिहाय प्रस्ताव मागविण्यात आले होते.
प्रत्येक विभागातून एक उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार निवडण्यात आला आहे. कोकण विभागातून ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, प्रबोधन करण्यात सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे वैभववाडी येथील सक्रिय कार्यकर्ते एस.पी. परब यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. प्रस्तावाची दखल घेत पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय लाड व सचिव अरुण वाघमारे व राज्य कार्यकारिणीने परब यांची निवड जाहीर केली आहे.परब हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ते अनेक वर्ष ग्राहक चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व एका ग्राहकाभिमुख मासिकाची वार्षिक वर्गणी असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार प्राप्त एस.पी. परब यांचे जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.