भाजपा युवा मोर्चा लोकसभा संयोजक संजय यादव यांची माहिती
लांजा (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कोकण पदवीधर निवडणुकीत देखील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना लांजा शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार लांजा तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून निरंजन डावखरे यांना मताधिक्य देणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा लोकसभा संयोजक संजय यादव यांनी सांगितले.
पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा युतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या निवडणुकी संदर्भात लांजा तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शहरातील पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी तालुका सामन्वयक सुमंत वाघदरे, शहर अध्यक्ष गुरुप्रसाद तेली, नगरसेवक ,गटनेता संजय यादव, जिल्हा पदाधिकारी हेमंत शेठ्ये विजय कुरुप , नगरसेवक मंगेश लांजेकर, बाबा लांजेकर तसेच किशोर यादव, प्रभाकर कोळवणकर, महिला शहराध्यक्ष संपदा कुरूप, निलम शेठ्ये, श्रीकांत विचारे हरीश जेधे, मयूर शेडे, सुयोग तोडकरी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते..
यावेळी कोकण पदवीधर निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार नारायण राणे यांना लांजा शहरातून जास्त मताधिक्य देण्यात आले होते. साधारणपणे लांजा तालुक्यात १५०० च्या आसपास पदवीधर मतदार असून सर्वाधिक मतदार हे लांजा शहरात म्हणजे सुमारे १००० च्या आसपास हे मतदार लांजा शहरात आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लांजा तालुका भाजपाच्या वतीने महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना शहरातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला असल्याचे संजय यादव यांनी सांगितले. सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते झटून यासाठी काम करत आहेत. त्यामुळे शहरातूनच नाही तर तालुक्यातून देखील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनाच मताधिक्य मिळणार असल्याचे संजय यादव व सुमंत वाघदरे यांनी सांगितले.












