गोळवण येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ!

Road work started at Golwan!

मसुरे | झुंजार पेडणेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या वाढिवसानिमित्त गोळवण – पोईप रस्त्याच्या डांबरीकरण आणि गटाराच्या कामाचा शुभारंभ गोळवण सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ग्रा.प. सदस्य आणि बूथ अध्यक्ष श्री. शरद मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्रीम, निलम पाताडे, श्री.व सौ. पाताडे, संतोष चव्हाण, संदेश पवार, वामन लाड,शशिकांत पवार, अशोक पवार, रामकृष्ण नाईक आणि ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.