Akhand Harinam Week from 13th to 19th April at Varchi Kumbharwadi in the city
लांजा | प्रतिनिधी : संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त लांजा वरची कुंभारवाडी येथे दिनांक १३ ते १९ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले जाणार आहे. दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती त्यानंतर ७.३० ते १३ या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, दुपारी तीन ते पाच संत तुकाराम महाराज गाथा भजन असे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दिनांक १३ एप्रिल रोजी ह. भ. प. प्रल्हाद देवळेकर यांचे प्रवचन तर ह. भ .प.पंढरीनाथ लांजेकर यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी १४ एप्रिल रोजी ह.भ.प. पुंडलिक लांजेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. ज्ञानेश्वर देवळेकर यांचे कीर्तन, शनिवारी १५ रोजी कोल्हापुर येथील ह.भ.प. भिकाजी शिंदे यांचे प्रवचन तर कासारवाडी कोल्हापुर येथील ह.भ. प. भिकाजी शिंदे यांचे कीर्तन होणार आहे. तसेच रविवारी १६ रोजी प्रभानवल्ली येथील ह भ प मारुती बुवा यांचे प्रवचन तर कोल्हापुरातील हभप भगवान शिंदे यांचे कीर्तन होणार आहे.
सोमवारी १७ एप्रिल रोजी पालू येथील ह भ प प्रभाकर साळवी यांचे प्रवचन तर पंढरपूर येथील ह भ प गुरुवर्य एकनाथ महाराज वासकर यांचे कीर्तन होणार आहे. १८ एप्रिल रोजी मुंबई येथील ह भ प ज्ञानेश शेट्ये यांचे प्रवचन तर ह भ प विठ्ठल महाराज वासकर यांचे कीर्तन होणार आहे.बुधवारी १९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता होणार असून त्यानंतर ह भ प दिगंबर बुवा सुतार (कोयनानगर) यांचे १०.ते १२ वेळेस काल्याचे किर्तन होणार आहे.