उन्हाची काहिली वाढल्याने थंड पेयांना वाढती मागणी

As the summer heats up, the demand for cold drinks increases

एप्रिलच्या सुरूवातीला उन्हाचे चटके

पाटपन्हाळे | योगेश तेलगडे : वातावरणातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने शृंगारतळीत जागोजागी थंड पेयांना मागणी वाढली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचा-यांसह खासगी वाहनांतील प्रवासीवर्गाचे पाय आता थंड पेयांच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉलधारकही खाद्यपदार्थांपेक्षा थंड पेयांच्या विक्रीवरच जास्त भर देत असल्याचे दिसते. मार्चपासूनच उष्मा जाणवू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला प्रचंड उन्हाचा कडाका पडल्याने तसेच अजून एप्रिल व मे महिना जायचा आहे. अधिकाधिक वाढत असलेल्या दाहकतेमुळे उन्हाचे चांगलेच चटके लागत आहेत. उन्हाच्या झळीमुळे दुचाकीवरून दुपारनंतर प्रवास आता नकोसा झाल्याने काही जण घरातच बसणे पसंत करताना दिसतात. तर अनेकजण उन्हापासून संरक्षण म्हणून टोपीचा वापर करताना दिसतात. अति उष्णतेमुळे रस्त्यावर चालताना पादचारी वर्गाची पावले आता थंड पेयांच्या दुकानांकडे वळताना दिसतात. यामध्ये लिंबू सरबत व उसाचा रसला अधिकाधिक पसंती मिळत आहे. सध्या मिनरल वॉटर, सरबत, उसाचा रस, या थंड पेयांबरोबर इतर पेयांची मागणी वाढली आहे.