खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल दोडामार्ग पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

महेश सारंग व संजू परब यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी । प्रतिनिधी : दोडामार्ग तालुका सहकारी खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबददल दोडामार्ग भाजपा मंडल अध्यक्ष सुधिर दळवी, जि.प. चे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व संजय विर्नोडकर यांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग तसेच भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा बँक संचालक तथा माजी सभापती रवी मडगावकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी अशोक दळवी, नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेवक मनोज नाईक, जिल्हा बँकेचे माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, भाजपचे पदाधिकारी मधुकर देसाई, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

Sindhudurg