Gurav community should get caste certificate as Hindu Gurav
लांजा तालुका गुरव उद्याची समाज बांधवांची मागणी
मागणीचे निवेदन लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर
लांजा | प्रतिनिधी : गुरव समाज बांधवांना हिंदू गुरव म्हणून जातीचा दाखला मिळावा अशी मागणी लांजा तालुका गुरव ज्ञाती समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन मंगळवारी ११ एप्रिल रोजी लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले. लांजा तालुका गुरव ज्ञाती समाज यांची बैठक मंगळवारी ११ एप्रिल रोजी त्रिमूर्ती मंगल कार्यालय लांजा येथे पार पडली. शासनाकडून जातीचे दाखले मिळत नाहीत त्यामुळे महसूल विभागाला निवेदन देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की आम्ही गुरव शासनाच्या इतर मागास प्रवर्गामध्ये हिंदू गुरव म्हणून नोंदणी झालेलो आहोत. त्यानुसार आजतागायत शासनाकडून आम्हा गुरव समाज बांधवांना इतर मागासवर्गीय म्हणून (ओबीसी) दाखले तहसीलदार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. सदर जातीचे दाखले उपविभागीय अधिकारी राजापूर (प्रांत) यांच्याकडून देण्यात येतात .
सदरचे दाखले देण्यात येत असताना शाळेच्या दाखल्याच्या नोंदीच्या आधारे देण्यात येतात. परंतु शाळेच्या दाखल्यावर नोंदी होत असताना हिंदू गुरव, हिंदू भाविक गुरव ,हिंदू मागासवर्ग याप्रमाणे नोंदी झालेल्या आहेत. वरील नोंदी वेगवेगळ्या असल्या तरीही हिंदू गुरव म्हणून एकच जात आहे. त्यामुळे शाळेच्या दाखल्यावर विविध नोंदी असल्या तरी आम्हाला हिंदू गुरव हा दाखला मिळण्यास विनंती आहे.तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन सादर करताना लांजा तालुका गुरव ज्ञाती समाज अध्यक्ष राजेश राणे, सचिव सुभाष गुरव, खजिनदार प्रकाश गुरव तसेच सदस्य म्हणून रघुनाथ गुरव, अशोक गुरव, वासुदेव गुरव, राजाराम गुरव, हरिश्चंद्र गुरव, हर्षद गुरव, वसंत गुरव, तानाजी गुरव, परशुराम गुरव, प्रतिभा गुरव, अंकुश गुरव आदी ् उपस्थित होते.