नांदगाव : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांनी नांदगाव उर्दू शाळेला २५ बेंचेस प्रदान केले. आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत बेंचेस शाळेला भेट देण्यात आले. नांदगाव उर्दू शाळेत पहिली ते सातवी चे वर्ग असून ७० विद्यार्थी आहेत. मात्र बेंचेसअभावी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेची गैरसोय होत होती. नांदगाव उर्दू शाळेला बेंचेस द्यावेत अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने आमदार नितेश राणेंकडे केली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी आमदार नितेश राणे यांनी २५ बेंचेस प्रदान केले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, नांदगाव माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, आयनल माजी सरपंच बापू फाटक, अहमद बटवाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे, रज्जाक बटवाले, शकील बटवाले, जाफर कुणकेरकर, सद्दाम कुणकेरकर, यासिर मास्के, गवस साटविलकर, गफार बटवाले, फिरोज नावलेकर, शाळा मुख्याध्यापक मुंगी व शिक्षक वृंद उपस्थित होते.