Organized National Lok Adalat at Civil Court Kankavli on 30th April.
कणकवली : दिवाणी न्यायालय कणकवली येथे रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, व मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे निर्देशांस अनुसरून तालुका विधी सेवा समिती, कणकवली तर्फे दिवाणी न्यायालय, कणकवली येथे रविवार दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी ‘राष्ट्रीय लोक अदालत’ चे आयोजन करणेत आलेले आहे.
पक्षकारांच्या हितासाठी ही लोकअदालत होणार आहे. त्यातून त्यांना कमी वेळात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची दिवाणी, फौजदारी व कौटुंबिक व पोटगी इत्यादी प्रकरणे तसेच म. रा. वि. वितरण कंपनी, बी.एस. एन. एल, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत आदी जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करुन वापूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यावे, यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. कोणत्याही पक्षकार व वकील यांना न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये लोकअदालतीपुर्वी आपले प्रकरणांची पूर्व बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांच्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्याकरीता संबंधितानी दिवाणी न्यायालय कणकवली येथे संपर्क साधावा असे आवाहन मा. श्री. टी. एच. शेख, दिवाणी न्यायाधीश क स्तर कणकवली व मा. श्री. एम. बी. सोनटक्के, सहदिवाणी न्यायाधीश यांनी केले आहे.