अध्यक्ष पदी राजेंद्र शिर्के यांची निवड
चिपळूण (वार्ताहर ) : तालुक्यातील चिवेली गावातील गावठणवाडी येथील ग्रामस्थांनी ‘चिवेली गावठणवाडी विकास मंडळ’ या सामाजिक संस्थेची नुकतीच स्थापना केली असून या संस्थेच्या अध्यक्ष पदी राजेंद्र शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.
गावठणवाडी च्या सर्वांगीण विकासासाठी तसेच वार्षिक सण-समारंभ व अन्य सांस्कृतिक उपक्रमांच्या पूर्ततेसाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाची नवनिर्वाचत कार्यकारिणी व सल्लागार पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली आहे.
यामध्ये अध्यक्ष पदी राजेंद्र शंकर शिर्के, उपाध्यक्ष संदेश श्रीकृष्ण शिर्के, सरचिटणीस विजय शांताराम शिर्के, सहचिटणीस दिनेश नारायण शिर्के, कोषाध्यक्ष शेखर सूर्यकांत शिर्के हे पदाधिकारी व शैलेश शाहू कदम, सिद्धेश रविंद्र शिर्के, वैभव रमेश शिर्के व पराग प्रकाश शिर्के यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून दिलीप शिवराम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मंडळाचे सल्लागार म्हणून वाडीतल ज्येष्ठ नागरिक मोहन गोविंद शिर्के, प्रकाश लक्ष्मण शिर्के, जयवंत बाळकृष्ण शिर्के, अशोक अर्जुन शिर्के, विलास विष्णू शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच गावातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान प्रमुख कार्यवाह रमेश रघुनाथ शिर्के हे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. चिवेली गावठणवाडी विकास मंडळ या संस्थेच्या स्थापनेमुळे गावठणवाडीतील पुणे-मुंबई तसेच स्थानिक ग्रामस्थानी आनंद व्यक्त करुन नवनिर्वाचित कार्यकारिणी, सल्लागार यांचे अभिनंदन केले आहे.