सह्याद्रीच वारं कानात भरलेल्या खेड चे प्रा. सिद्धार्थ देसाई यांची दुर्गभ्रमंतीचे ‘शतक’ पूर्ण

Google search engine
Google search engine

Prof. Sahyadri from the village full of wind. Siddharth Desai’s Durgbharmanti ‘Century’ completed

 

आगामी पाच वर्षात २९५ किल्ले सर करण्याचा मानस

देवेंद्र जाधव | खेड : येथील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कुल चे सहायक प्राध्यापक व दुर्गअभ्यासक श्री. सिद्धार्थ उर्फ भगवान देसाई यांनी आपल्या दुर्गभ्रमंतीची शतक पूर्ण केले आहे. कुर्डुवाडी सारखा आव्हानात्मक असणारा गड सर करून त्यांनी हे शतक पूर्ण केल्याबद्धल खेड तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१९९६ मध्ये अवघ्या वयाच्या १३ वर्षी किल्ले रायगडाची प्रदक्षिणा पूर्ण केल्याने सर्वात कमी वयाचा “प्रदक्षिणावीर” म्हणून गौरव करण्यात आला. बाल वयातच गड किल्यांची आवड निर्माण झाली. या छंदाचे एक वैशिष्ट्य आहे. की एकदा सह्याद्रीच वार कानात भरलं की पावलं आपसूकच तिकडची वाट धरू लागतात. निसर्गाच हे भव्य रूप पाहून आपल्यातील खुजे पणाची जाणीव होते. इथल्या डोंगर दऱ्यात राहणारी माणस भेटतात तेव्हा खरी माणुसकी समजते आपल्याला आपलं इतिहास, भूगोल जाणून घ्यायचं असेल तर गिरिभ्रमण आणि निसर्गाच्या सानिध्यात जाण आवश्यक असत. “आवड असेल तर सवड मिळते” या उक्तीनुसार नोकरी, व्यवसाय, सांभाळत कुटुंबाच्या साथीमुळे मिळणाऱ्या वेळेत हा छंद आपण जोपासला आहे.

अनेक तास सायकल, मोटारसायकल, कार, बस ,रेल्वेने प्रवास करून गड आणि पायथा गाठायचा मग तीन चार तासांची पायपीट करून पुन्हा घर गाठायचं हा दिनक्रम यातील डोंगरमाथा गाठण्याचा क्षण हा अविस्मरणीय असतो
यात सर्व श्रमांची परतफेड होते. त्या एका क्षणासाठी कितीही पायपीट करावी लागली. तरी त्याचे काही वाटत नसल्याचे देसाई यांनी सांगितले. या छंदामुळे शरीर मन सुदृढ होते. तर जगमित्र ही होता. येते आपण महाराष्ट्रातील लोक खुप सुदैवी आहोत आपल्याकडे पाहायला ३५० किल्ले आहेत. एक एक किल्ला हा इतिहासाचे सुवर्ण पान आहे. साडेतिनशे किल्ले आहेत पहायला,एक एक किल्ला म्हणजे इतिहासाचे सुवर्ण पान आहे. अगदी चालुक्य, यादव कालापासुन गड किल्ले बांधले गेले आहेत. राजानी यांचे महत्व ओळखले व आपले राज्य स्थापन केले. आजही या गड किल्ल्यांवर गेलो कि मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलते, का जगायचं कशासाठी मरायचं ते समजते .

हा छंद जोपासताना आपोआप निसर्गाची ही गोडी लागते, निसर्ग पर्यावरण ,पाणी, शुद्ध हवा यांचे महत्व समजते. आता तरुणाईला हा छंद लागावा या साठी सर्वतोपरी कार्यरत रहायच असा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
देसाई यांनी भ्रमंती केलेले काही निवडक किल्ल्या मध्ये राजगड, तोरणा, सुधागड, सरसगड, रसाळगड, प्रचितगड, मानगड, कुर्डूगड, लोहगड, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांचा समावेश आहे
मागील वर्षभरात ७५ किल्ले पूर्ण केले आहेत. राज्यातील उर्वरित २९५ किल्ले पुढील पाच वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे.

गड किल्ल्यांची माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांना गड किल्ल्यांची आवड निर्माण करणे आपला इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचवणे इतकच असल्याचे ते सांगतात

अशी असते मोहिमेची तयारी

“गड किल्ले महाराष्ट्राचे” या पुस्तकातुन वाचन करून किल्याची पूर्ण माहिती करून १५ दिवस आधी जाण्याचे पूर्ण नियोजन करतो. गडावरील नेसर्गिक सौन्दर्याला बाधा येऊ नये अथवा आपल्याकडून अस्वछता होऊ नये यासाठी गाजर , काकडी, फळ यांचा आहारात समावेश असतो. आपल्या सोबत जाणाऱ्या सहकाऱ्यांना ही स्वछते बाबत काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देतो.