Election of Bhalchandra Jadhav as district president of Kamgar Kalyan Multipurpose Board
वैभववाडी | प्रतिनिधी : श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जाधव यांची तर सरचिटणीसपदी शशिकांत वळंजु यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे राज्यध्यक्ष तानाजी कुराडे व भारतीय लोकशक्ती पक्ष महाराष्ट्र महिला अध्यक्ष अनिता निकम यांच्या उपस्थितीत कोकिसरे येथे झालेल्या सभेत जिल्हा व वैभववाडी कार्यकारणीची नियुक्तीपञ देण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विलास पावसकर तर वैभववाडी तालुका अध्यक्षपदी दिलीप नारकर जिल्हा खजिनदार किशोर सुतार तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष वळंजु, दीपक निळेकर आदींची निवड करण्यात आली. यावेळी विजय तावडे, श्रीधर टक्के, प्रमोद नार्वेकर, बाळासो खाडे, नारायण सुळेभावे, श्रीराम तानवडे, नारायण नारकर, शांताराम नारकर, दाजी पाटणकर, प्रकाश बडवे, चंद्रकांत गुरव, दिलीप जाधव, श्रीधर पाटणकर, बापू सर्वणकर, धकलशेठ सरवणकर, सुरेश जठार, शिवराम पालकर, बापू टक्के, महाराष्ट्र अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.
असंघटीत क्षेञातील श्रमीक कलाकार व कामगार यांना संघटीत करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी मंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातही मंडळाची कार्यकारणी व सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कुराडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूञसंचलन दिलीप नारकर तर आभार दाजी पाटणकर यांनी मानले.