खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील कशेडी गावणकर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात आसावरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आसावरील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष निशांत शेठ, विश्वस्त किशोर श्राफ, सेक्रेटरी मुकुंद देशमुख, दीपक कटियार, स्वामी समर्थ उपासक मंडळ दादरचे उपासक संजय मोरे व्यवस्थापक समीर मोरे, योगेश मपारा, रवी मालणकर, निलेश वाडकर, पंकज शेठ, रोहन वाडीले. नामदेव शेलार, उपशिक्षक मनोहर पेंडखळकर, केशव नागरगोजे, कशेडी लिटी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पांगुळ, शिंदे, पोलीस पाटील स्वरा गावणकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कशेडी-गावणकर शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी केले.











