शिवडाव माध्यमिक विद्यालयात, दप्तराविना शाळा ‌उपक्रम

 

 

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयात २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी इ. ५ वी ते इ. ८ वी इयत्तांची दप्तराविना शाळा भरविण्यात आली. तसेच शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

 

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान आपला हक्क आणि अधिकार आहे याचे महत्त्व सांगितले. हा उपक्रम राबविण्यात ज्येष्ठ शिक्षिका रिया गोसावी, सौ. पाताडे, सौ. पाटील, श्रीम. तेली आणि श्री. देसाई यांचे सहकार्य लाभले.

 

तसेच कार्यानुभव विषयातंर्गत पौष्टिक भेळ बनविण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका रिय गोसावी , सौ. पाताडे , सौ. पाटील यांनी दिले. विद्यार्थ्यांनी त्याची पाककृती लिहून घेतली व पौष्टिक भेळेचा आनंद घेतला.

 

दप्तराविना शाळा , शालेय स्वराज्य निवडणूक २०२४ – २५ आणि पौष्टिक भेळ बनविणे प्रात्यक्षिक हे उपक्रम आनंदात पार पडले.

 

यावेळी शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीम.भाग्यरेखा दळवी, खजिनदार विद्याधर गावकर, सदस्य आर्किटेक्ट श्री.गणेश म्हसकर यावेळी उपस्थित होते.