कणकवली पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अजित सावंत ; सचिवपदी माणिक सावंत तर खजिनदारपदी योगेश गोडवे

Google search engine
Google search engine

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार समितीची निवडणूक प्रक्रिया झाली. यात अध्यक्षपदी अजित सावंत, सचिवपदी माणिक सावंत तर खजिनदारपदी योगेश गोडवे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले आणि सहसचिवपदी उत्तम सावंत यांची निवड झाली. कणकवली शासकीय विश्रामगृहात कणकवली तालुका पत्रकार समितीची वार्षिक सभा झाली. यात निवडणूक निरीक्षक म्‍हणून जिल्‍हा पत्रकार संघाचे देवयानी वरसकर, दिलीप खडपकर, आणि प्रकाश काळे यांनी काम पाहिले. अध्यक्षपदासाठी अजित सावंत आणि भगवान लोके उमेदवार होते. त्‍यामुळे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात अजित सावंत हे विजयी ठरले. पत्रकार समितीच्या इतर निवडी बिनविरोध ठरल्‍या. पत्रकार संघाच्या कार्यकारीणी सदस्यांमध्ये भास्कर रासम, अस्मिता गिडाळे, किशोर राणे, उमेश बुचडे आणि तुषार हजारे यांची एकमताने निवड करण्यात आली.